Breaking News

महिला बचत गटाची चळवळ व्यापक करणार : सभापती शेळके


अहमदनगर/प्रतिनिधी : “शहरात महापालिकेच्या माध्यमातून महिलांसाठी विविध उपक्रम राबविण्याचा, शासनाच्या सर्व योजना लाभार्थी महिलांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला जाणार असून शहरात महिला बचत गटाची चळवळ व्यापक करण्यासाठीही प्रयत्नशील राहणार आहे’’ असे प्रतिपादन महिला व बालकल्याण समितीच्या सभापती लताबाई शेळके यांनी केले.
महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड झालेल्या लताबाई शेळके यांनी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी (दि.8) सभापती पदाचा पदभार घेतला.
यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ढोणे, जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, स्थायी समितीचे सभापती मुदस्सर शेख, सभागृहनेते स्वप्नील शिंदे, नगरसेवक गणेश भोसले, संपत बारस्कर, कुमार वाकळे, मनोज कोतकर, गौरी नन्नावरे, सोनाबाई शिंदे, ज्योती गाडे, मीना चव्हाण, परवीन कुरेशी, मीना चोपडा, शोभा बोरकर, रिझवाना शेख, अनिता पंजाबी, बलभीम शेळके आदी उपस्थित होते.