निसर्गसंवर्धनासाठी मणदुरे काऊदर्‍यावर निसर्गपूजा


पाटण / राजेंद्र लोंढे : निसर्गावर होणारे अतिक्रमण, वाढती जंगलतोड यामुळे होणारा पर्यावरणाचा र्‍हास आणि पृथ्वीवर येणारे नैसर्गिक संकट थांबवण्यासाठी पाटण तालुक्यात मणदुरेच्या काऊदर्‍यावर मार्तंड जानाईदेवीच्या हजारो भक्तांनी जानाईदेवीचा गुलाल आणि खंडेरायाच्या भंडार्‍याची उधळण करीत गुरुवारी सकाळी निसर्ग पुजा संपन्न केली. यावेळी तीथर्र्क्षेत्र निवकणे जानाईदेवी यात्रेनिमित्त जेजुरीहून येणार्‍या मार्तंड - जानाईदेवी पालखी सोहळ्याचे पाटण, मणदुरे, काऊदरा परिसरातील हजारो नागरिकांनी स्वागत केले. यावेळी जानाईच्या नावान चांगभल, खंडोबाच्या नावान चांगभलंच्या जयघोषाने काऊदरा परिसर दणाणून गेला होता.

निवकणे जानाईदेवी यात्रेनिमित्त जेजुरी येथून मार्तंड- जानाई भक्तांचा पायी पालखी सोहळा आठ दिवस प्रवास करत नऊव्या दिवशी सकाळी मणदुरे काऊद-यावर येतो. हा पालखी सोहळा बुधवारी मुक्कामी तारळे येथे होता. गुरूवारी पहाटे हा पालखी सोहळा मणदुरे काऊदर्‍यावर आला असता येथे पालखीचे पूजन व स्वागत तसेच पर्यावरण संवर्धनासाठी निसर्गपूजा करण्यात आली. त्यावेळी सह्याद्रीच्या कड्या कपारीत राहणार्‍या व निसर्ग संवर्धन करणार्‍या महिलांची साडी- चोळीने ओटी भरण्यात आली. त्यानंतर जानाई- मार्तंड अन्नदान ट्रस्टतर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तर निसर्गातील पर्यावरणाचा होणारा र्‍हास, मोठ्या प्रमाणावर होत असलेली जंगलतोड रोखली जावी. आपल्या आजुबाजूचा परिसर निसर्गसौंदर्य टिकून राहण्यासाठी वृक्ष संवर्धनासाठी आवाहन करत जेजुरी येथील ग्रामस्थांनी राज्याला जागृतीचा अनोखा संदेश देणारी निसर्गपूजा हजारो भक्तगणांच्या उपस्थितीत जानाईदेवी पालखी सोहळ्याच्या निमित्ताने केली. यावेळी जेजुरीतील अभिषेक बावळे, वैभव रसाळ, विक्रम यादव यांनी तयार केलेल्या ड्रोनच्या सहाय्याने सोहळ्याप्रसंगी पुष्पवृष्टी झाडंच्या बियांची उधळण करण्यात आली.

यावेळी जेजुरीच्या नगराध्यक्षा वीणा सोनवणे, जानाईदेवी अन्नदान सेवा ट्रस्टचे अध्यक्ष बाळकृष्ण बारबाई, निसर्गपूजा प्रवर्तक विजयकुमार हरिश्र्चंद्रे, विनय गुरव, पाटण पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नितीन खैरमोडे, विक्रांत कांबळे, विद्या म्हासुर्णेकर-नारकर, राजेंद्र सावंत, विजया म्हासुर्णेकर, मनसेचे पाटण तालुकाध्यक्ष गोरख नारकर, राजेंद्र बारबाई, जेजुरीचे नगरसेवक बाळकृष्ण बारबाई, रमेश बयास, शिवाजी कुतवळ, रत्नाकर मोरे, रवी बारबाइ, यादवराव देवकांत, शोभा कदम, शशिकला हादवे, खाशाबा चव्हाण आदी उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget