Breaking News

माण शिक्षक समितीचे पोलिसांना निवेदनबिदाल/प्रतिनिधी : प्रा. नामदेव जाधव यांनी शिक्षकांबद्दल बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊन कारवाई करावी, असे निवेदन माण तालुका शिक्षक समितीतर्फे दहिवडी पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आले आहे.
या निवेदनात संघटनेने म्हटले आहे की, प्रा. नामदेव जाधव यांनी एका जाहीर कार्यक्रमात जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकेंतर्गत कार्यरत शिक्षकांना ’देशद्रोही’ असा अपशब्द वापरला आहे. त्यामुळे शिक्षक वर्गात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमिवर शिक्षक समितीतर्फे प्रा. जाधव यांचा निषेध करीत त्यांच्यावर कारवाईची मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदन देताना शिक्षक समितीचे नेते अजितराव जगदाळे, श्रीकांत दोरगे, तालुकाध्यक्ष राजेंद्रकुमार कदम, सरचिटणीस विजय बनसोडे, कार्याध्यक्ष सुशील त्रिगुणे, सहसचिव महादेव महानवर, संपर्कप्रमुख महादेव दडस आदी उपस्थित होते.