Breaking News

चांद्यात महिला दिन उत्साहात साजरा


चांदे/प्रतिनिधी
नेवासे तालुक्यातील चांदे येथे जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत व जवाहर माध्यमिक विद्यालयात जागतिक महिलादिन उत्साहात साजरा करण्यात आला. चांदे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महिलादिनानिमित्त महिलांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापिका आसराबाई गारुडकर यांनी महिलादिनाचे महत्व उपस्थित महिलांना सांगितले.
यावेळी शिक्षिका शांता मरकड, सुजाता किंबहुणे, स्वाती नन्नवरे, शीतल शिंदे , अनिता जाधव, मंगल पिंपळे, बेबी वावरे, विमल होले, मारिया गाढवे या व आदी महिला उपस्थित होत्या. यावेळी विद्यालयातील महिला शिक्षिकांचा सन्मान करण्यात आला. तसेच अहमदनगर जिल्हा गणित अध्यापक मंडळ यांच्यावतीने आयोजित गणित प्रश्‍नमंजुषा व गणित प्राविण्य स्पर्धेत नेत्रदीपक यश मिळवणारे हर्षवर्धन महेश लोखंडे, अक्षय सोपान फरताळे, उदय रविंद्र गाडेकर, रसिका पोपट शेटे, गौरव भाऊसाहेब पवार या विद्यार्थ्यांचा व सर्व मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.