Breaking News

कुकडी कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता


श्रीगोंदा/प्रतिनिधी : पिंपळगाव पिसा येथील कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता सोमवारी दि.25 कुकडी कारखान्याचे ओम गुरुदेव महिला ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्थेच्या अध्यक्षा अनुराधा कुंडलिकराव जगताप व डॉ. प्रणती राहुल जगताप यांच्या शुभेहस्ते तसेच सर्व अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी व ऊस तोडणी मुकादम वाहतुकदार यांच्या उपस्थितीत विधिवत गव्हाण पुजन करुन करण्यात आला.

साखर कारखानदारीत रात्रदिवस अनेक चाके फिरत असतात. अनेक लोक राबत असतांना 150 दिवसांचा गाळप हंगाम निर्विघ्नपणे पार पडला असून कारखान्याने 7 लाख 69 हजार 650 साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. कर्मयोगी स्व. कुंडलिकराव जगताप यांच्या आशिर्वादाने व कारखान्याचे अध्यक्ष आ. राहुल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने 6 लाख 91 हजार 950 मेट्रीक टन ऊसाचे गाळप करुन 7 लाख 69 हजार 650 साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. सरासरी साखर उतारा 11.20 टक्के मिळालेला असून आज अखेर विज उत्पादन 3 कोटी 51 लाख इतके युनिट झालेले आहे. या सांगता कार्यक्रमास कारखान्याचे संचालक बाळासाहेब उगले, निवृत्ती वाखारे, अंकुश रोडे, प्रल्हाद इथापे, उत्तमराव शिंदे, मा. संचालक कचरुमामा मोरे, कार्यकारी संचालक दत्तात्रय मरकड, कामगार संघटना अध्यक्ष कल्याणपाटील जगताप, बंडोपंत धारकर, चिफ अकौंटंट नारायण सरोदे, चिफ इंजिनिअर भास्करराव काकडे, चिफ केमिस्ट गोपिनाथ पवार, शेतकी अधिकारी सुभाष कुताळ, अधिकारी, कर्मचारी व ऊस तोडणी वाहतुकदार उपस्थित होते.