Breaking News

स्वाभिमानीचा कराड-विटा मार्गावर रास्तारोको


कराड /प्रतिनिधी : तहसीलदार कार्यालयात स्वाभिमानी संघटना, साखर कारखान्यांचे प्रतिनिधी व प्रशासन यांच्यात झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे कारखान्यांनी ऊसाची थकबाकी व एफ़आरपीची रक्कम शेतकर्‍यांना कधी देणार ते लेखी दिले नाही. त्यामुळे शनिवारी (दि.) सकाळी कराड- विटा मार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रास्तारोको आंदोलन केले.

कराड- विटा मार्गावर स्वाभिमानी संघटनेच्या वतीने बारा वाजता रास्तारोको करण्यात आला. यावेळी अनिल घराळ, प्रसाद धोकटे, सुभाष नलवडे, अशोक जाधव, सुदाम चव्हाण यांच्यासह शेतकरी उपस्थित आंदोलकांनी घोषणा दिल्या. रास्तारोको प्रसंगी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. आंदोलनास पोलिस अधीक्षक नवनाथ ढवळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी भेट देवून त्यांचे निवेदन स्विकारले. रास्तोरोकमुळे लांबचलांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मात्र पोलिसांच्या योग्य नियोजनामुळे वाहतूक केवळ दहा मिनिटांत व्यवस्थित करण्यात आली.

निवेदनात म्हटले आहे की, गेले पाच दिवस स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, शिवाजी पाटील, सुभाष शिंदे ऊसाची थकित एफआरपी व मागील थकबाकी त्वरीत मिळणेसाठी तहसिल कार्यालया समोर आमरण उपोषणास बसले आहेत ते उपोषण कारखानदारांच्या उपोषणानंतर मागे घेण्यात आले.