Breaking News

करांडेवाडीत बालमल्लांच्या कुस्त्यांनी शौकिनांची जिंकली मने


औंध / प्रतिनिधी : खटाव तालुक्यातील करांडेवाडी येथील कुस्ती मैदानात संग्राम सूर्यवंशी (लांडेवाडी) याने अमोल पवार (साळशिंगे) यांच्यावर एकचाक डावावर प्रेक्षणीय विजय मिळवला. तर अनेक बालमल्लांनीही या मैदानात चटकदार कुस्त्या करून उपस्थितांची वाहवा मिळवली.

ग्रामदैवत श्रीगणेश यात्रेनिमित्त ग्रामस्थांतर्फे कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. महिला गटातील शैला भोसले विरुद्ध शिवानी पवार ही कुस्ती वर्धन अँग्रो कारखान्याचे चेअरमन धैर्यशील कदम यांच्या हस्ते, अमोल फडतरे, सचिन घाडगे, वसंतराव जानकर, सचिन सुर्यवंशी, सतिश सोलापुरे, जालिंदर राऊत, किसन आमले, यांच्या उपस्थितीत लावण्यात आली. त्यामध्ये शिवानीने शैलाला ढाक डावावर चितपट केले. यावेळी मैदानात किसन तनपुरे, ओंकार सूर्यवंशी, करण येवले, आर्यन फडतरे, तुषार येवले, योगेश पाटोळे, ऋषिकेश जाधव, गणेश फडतरे, आकाश पवार, विजय यादव, रोहित पवार यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी मल्लावर नेत्रदीपक विजय मिळवले. उमेश पाटील यांनी मैदानात समालोचन केले मैदान यशस्वी करण्यासाठी यात्रा कमेटी आणि करांडेवाडी ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले.