Breaking News

प्लास्टिक साठा केल्याप्रकरणी शेंद्रे येथीन मटण विक्रेत्यास दंडशेंद्रे / प्रतिनिधी : येथे मटण विक्री करणार्‍या दुकानदारास प्लास्टिक पिशव्यांचा साठा करुन वापर केल्याबद्दल 5 हजारांचा दंड ठोठावण्यात आला.
शेंद्रे येथे मटण, चिकन दुकानदारांची संख्या 5 इतकी आहे. 16 मार्च रोजी गावातील प्रमुख संस्था, हॉटेल मालक, किराणा दुकानदार व चिकन, मटण दुकानदार यांची ग्रामपंचायत कार्यालयात बैठक आयोजित केली होती. यावेळी संपूर्ण स्वच्छता अभियान कक्षातील बी. आर. सी. व सरपंच, उपसरपंच सदस्य उपस्थित होते. या वेळी सर्व दुकानदारांना प्लास्टिक वापराबाबत निर्बंध असलेचे सांगून प्लास्टिक पिशव्यांचा वापर करण्यास मनाई असल्याचे सांगितले होते. 27 मार्च रोजी प्रत्येक व्यावसायिक दुकानदारास नोटीसद्वारे प्लास्टिक बंदीबाबत कळविण्यात आले होते व याबाबत वारंवार स्पिकरद्वारे दवंडीने व फ्लेक्सद्वारे जनजागृती केली होती. गावात घनकचरा प्रकल्प सुरू केलेला आहे, तसेच प्लास्टिक संकलन केंद्र स्थापन केलेले आहे. सार्वजनिक स्वच्छता ही प्रत्येकाची वैयक्तिक जवाबदारी आहे आणि प्रत्येकाने सहकार्य करुन आपला गाव परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे, असे आवाहन केले होते.
26 मार्च रोजी प्लास्टिक पिशव्यांचा चिकन-मटण दुकानदार वापर करीत असल्याबाबतच्या तक्रारीवरून ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी, ग्रामस्थ यांच्या उपस्थित मकसुद दस्तगीर पालकर, मटण विक्रेता (शेंद्रे) यास प्लास्टिक पिशव्यांचा साठा करणे व मटण विक्रीसाठी प्लास्टिक पिशव्यांचा वापर केल्याबद्दल 5 हजार रूपये दंड करुन तो वसूल करण्यात आला.