Breaking News

होळकरशाहीचे ऐतिहासिक वैभव शिखर शिंगणापूर घाटातील ‘होळकर बारव’बिदाल / प्रतिनिधी : पश्र्चिम महाराष्ट्रातील जागृत देवस्थान तथा छत्रपती राजे शिवाजी भोसले परिवाराचे कुलदैवत शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेव प्राचीन व ऐतिहासिक असून तो उंच डोंगरावर आहे हे प्रेक्षणीय स्थळ सातारा जिल्ह्यात माण तालुक्यात असून शिखर शिंगणापूर येथून नातपुते घाटातून जाताना तीव्र उताराच्या बाजूला एक शिवलिंग आकाराची ऐतिहासिक दगड बारव बारामाही तुडुंब भरलेली असते. या बारवेबद्दल पुस्तक साधनात शोध घेतला असता सदरातील बारव होळकरशाहीतील असून बारवेचे निर्माण पुण्यश्र्लोक आहिल्यादेवी होळकर यांनी केली असल्याचे संदर्भ पुरातत्त्व विभागाच्या पुस्तकात सापडतात बारवेला खाली उतरण्यासाठी दहा दगडी पायर्‍या पासून वीस फूट तसेच दहा फुटांचा गोल बारवेची खोली अडीच परस असून त्यात गाळ साचलेला आहे. नातेपुते तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथून पिंपरी मार्गे शिंगणापूर घाटातील बारव 9 किलोमीटर अंतरावर असून इतिहासाची साक्ष देणारी दगडी बारव आपले अस्तित्व टिकून आहे. ऍड संजय पाटील माने व होळकरशाही अभ्यासक्रम रामभाऊ लांडे यांनी ही माहिती दिली .