Breaking News

'स्वाईन फ्लू' आजाराविषयी आज मार्गदर्शनपर कार्यशाळा पट्टा


राहाता/प्रतिनिधी : स्वाईन फ्लू आजारासंदर्भात सविस्तर माहिती व उपचाराबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आज राहाता येथे कार्यशाळेचे आयोजन केले आहे. दुपारी एक वाजता कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेस शहरातील डॉक्टरांनी उपस्थित रहावेअसे आवाहन राहाता ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गोकुळ घोगरे यांनी केले.

आज पार पडणाऱ्या कार्यशाळेत स्वाईन फ्लूच्या आजाराचा आढावा व प्रशिक्षण याविषयी महत्वपूर्ण माहिती दिली जाणार आहे राहाता तालुक्यात स्वाईन फ्लू आजाराचे संशयित रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. याविषयीआरोग्य उपसंचालक कार्यालयाकडून आलेल्या मार्गदर्शन व सूचनांनुसार ही कार्यशाळा घेतली जाणार आहे. खासगी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डाॅक्टरांनी या संदर्भात कोणती महत्वपुर्ण काळजी घ्यावी याचबरोबर शासकीय आरोग्ययंत्रणेकडे यासाठी उपलब्ध असणारे उपचार यासह इतर महत्वपूर्ण माहिती दिली जाणार आहे. अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. गोकुळ घोगरे यांनी दिली.