Breaking News

विजय संकल्प दुचाकी रॅलीने कराडला भाजपाचे शक्तीप्रदर्शन


कराड, (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीतर्फे येत्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्र्वभूमीवर देशभरात आज  विजय संकल्प रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून आज कराड दक्षिण भाजपाच्या हजारोकार्यकर्त्यांनी दुचाकीवर स्वार होत विजय संकल्प रॅली काढून जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

ढेबेवाडी फाटा येथे राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष ना. शेखर चरेगावकर व श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष ना. डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते झेंडा फडकावून रॅलीचा प्रारंभ करण्यात आला. पक्षाच्याआणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाच्या घोषणा देत ही रॅली कोल्हापूर नाका-दत्त चौक-प्रीतिसंगम घाट - विजय दिवस चौक-कार्वे - दुशेरे - शेरे - गोंदी-रेठरे बुद्रुक - रेठरे खुर्द- वाठार - काले - धोंडेवाडी- ओंड- उंडाळे- नांदगाव- तुळसण- कोळे- कोळेवाडी-घारेवाडी- विंग- चचेगावमार्गे मलकापूर येथे ढेबेवाडी फाट्यावर आल्यावर रॅलीचे विसर्जन करण्यात आले.

या रॅलीमध्ये भाजपाचे विस्तारक आनंदराव शिंदे, तालुकाध्यक्ष हर्षवर्धन मोहिते, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, मोहनराव जाधव, मलकापूरचे नगरसेवक दिनेश रैनाक, राजू मुल्ला, माजी नगराध्यक्ष आबा गावडे, प्रमोद पाटील, गफारनदाफ यांच्यासह हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.