Breaking News

ज्ञानसंपन्न व्यक्तींनीच क्रांती घडविल्याचा इतिहास आहे - पटेल


अहमदनगर/प्रतिनिधी: धनसंपत्तीपेक्षा ज्ञानसंपत्ती श्रेष्ठ आहे. ज्ञानाने व्यक्तीमत्व उजळून निघते. धनाढ्यांनी नव्हे तर ज्ञानसंपन्न व्यक्तींनी क्रांती घडविल्याचा इतिहास आहे. सर्वसंपन्न होण्यासाठी ज्ञान आत्मसातकेले पाहिजे. तर ज्ञान वाढविण्यासाठी वाचन महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन माजी साखर आयुक्त फैय्याज पटेल यांनी केले. तर स्वत:शी स्पर्धा करुन ज्ञानाने जीवनात ध्येय प्राप्ती करण्याचेआवाहन त्यांनी केले.

कर्मयोगी प्रतिष्ठानच्या वतीने वैद्यकिय, वकिल व क्रीडा क्षेत्रात यश संपादन करणार्‍या युवक-युवतींचा गौरव तर पब्लिक नोटरीपदी नियुक्ती झालेल्या वकिलांचा सत्कार करण्यात आला.यावेळी अध्यक्षीय भाषणात फैय्याज पटेल बोलत होते