Breaking News

खा. लोखंडेंचा 'उतावीळ 'प्रचार


देवळाली प्रवरा/प्रतिनिधी: येत्या काही दिवसांतच लोकसभा निवडणूकीचे बिगुल वाजणार असून शिर्डी लोकसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवार उमेदवारीसाठी नेत्यांचे उंबरठे झिजवण्यातव्यस्त आहे.मात्र शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे एलईडी स्क्रीन वाहन पंचक्रोशीत फिरवून केलेल्या कामाची माहिती डॉक्युमेंट्रीच्यामाध्यमातून जनतेसमोर मांडून मतदारांना आपलंसं करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

येत्या काही दिवसात लोकसभा निवडणुकिसाठी आचारसंहिता लागणार आहे.त्यासाठी शिर्डी लोकसभा मतदारसंघात अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधूनआहे. गेल्या निवडणुकीत अवघ्या १६ ते १७ दिवसांत शिवसेनेचे सदाशिव लोखंडे खासदार बनले होते. निवडून आल्यानंतर त्यांनी मतदारसंघातील जनतेशी फारसासंपर्क ठेवला नव्हता. अनेकांनी याबाबत जाहीर नाराजीही व्यक्त केली आहे. 

दरम्यान येत्या काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकिसाठी शिर्डी लोकसभामतदारसंघातून सेनेची उमेदवारी विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना निश्चित मानली जाते. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी लोखंडे यांच्याउमेदवारीस होकार देऊन कामाला लागण्याच्या सूचना केल्या आहेत. नुकतेच आ.नरेंद्र दराडे यांच्यावर शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुख म्हणूनमातोश्रीवरून निवड करण्यात आली. त्यानुसार त्यांनी तालुकावाईज सेनेच्या पदाधिकारी