Breaking News

गणपती मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह


पारनेर / प्रतिनिधी

पारनेर तालुक्यातील विरोली गणपती चौफुला येथील गणपती मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ झाला .वै . हभप नाना महाराज वनकुटेकर यांच्या कृपा आशिर्वादाने २९ वर्षापुर्वी यासप्ताहाची सुरवात झाली .

११ मार्च ते १८ मार्च दरम्यान महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांच्या माध्यमातुन ज्ञानदान होणार आहे. यामध्ये अशोक महाराज रेपाळे, आप्पासाहेब पाटील, राहुलचत्तर नवनाथ महाराजमाशेरे, रमेश कुलकर्णी, वासुंदे घोडके,आदींची कीर्तनसेवा होणार आहे. हभप बाळकृष्ण कांबळे महाराजांच्या काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे .