Breaking News

कारखानदारांच्या आश्वासनानंतर स्वाभिमानीचे उपोषण मागे


कराड /प्रतिनिधी - शेतकर्‍यांच्या एफआरपीच्या मुद्यावर दि. 4 मार्चपासून तहसिल कार्यालयासमोर सुरु असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपोषण कारखान्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर सहाव्या दिवशी जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांच्यासह पदाधिकार्‍यांनी शनिवारी सायंकाळी मागे घेतले.

गेली पाच दिवसापासून एफआरपीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांचेसह शिवाजी पाटील, सुभाष शिंदे उपोषणास बसलेले होते. सायंकाळी कराड तालुक्यातील सह्याद्री, कृष्णा, जयवंत शुगर, रयत अथनी या कारखान्याच्या व्यवस्थापनाने स्वाभिमानीच्या मागणीचा विचार करीत 30 मे पर्यत शेतकर्‌यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यानी प्रांताधिकारी हिम्मत खराडे, तहसिलदार अमरदीप वाकडे, पोलीस उपअधिक्षक नवनाथ ढवळे यांचे उपस्थितीत उपोषण मागे घेतले.