Breaking News

मराठा समाज्याबद्दल अपशब्द, पत्रकारास अटक


जामखेड ता/प्रतिनिधी
मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरणारे पत्रकार मोहिद्दीन तांबोळी विरोधात जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून आज दि.10 रोजी पहाटे पत्रकाराला अटक करण्यात आली आहे. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

तालुक्यातील पिंपळगाव उंडा येथिल उपसरपंच गणेश जगताप यांच्या विषयी बोलताना फोनवर मराठा समाजाच्या भावना दुखावतील अशा खालच्या पातळीवर जाऊन बोलल्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या. ही क्लिप व्हायरल झाली व सोशल मीडियावर अनेक तरुणांनी तीव्र भावना व्यक्त केल्या काल दि.9 रोजी गणेश जगताप यांनी जामखेड पोलिस स्टेशनला पत्रकार तांबोळी विरोधात फिर्याद दाखल केली. आज दि.10 रोजी पहाटे तांबोळी यांना त्यांच्या राहत्या घरी जाऊन अटक केली. आज सकाळी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. तालुक्यातील सर्व पत्रकारांनी तहसील कार्यालयात एकत्र येऊन तांबोळी यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला. व योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.