Breaking News

जामखेडला अँरो फिल्टरच्या पाणी पुरवठ्यासाठी निधी मंजूर


जामखेड/प्रतिनिधी : जामखेड सारख्या ग्रामीण भागात तरूणांनी एकत्र येऊन यूनिकाँन डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड कंट्रक्शनच्या माध्यमातून जामखेडच्या वैभवात भर घालणारा प्रकल्प सुरू केला आहे. हा संपूर्ण प्रोजेक्ट शासनाच्या रेरा कायद्याअंतर्गत असल्याने ग्राहकांना वेळेत प्रकल्प पूर्ण करून मिळेल. तसेच जामखेडला लवकरच अँरो फिल्टरचे पाणी पुरवठा केला जाईल. त्यासाठी 104 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. असे पालकमंत्री राम शिंदे यांनी अपार्टमेंटच्या भुमिपूजन प्रसंगी सांगितले.

यावेळी आ. भिमराव धोंडे सभापती सूभाष आव्हाड, जिल्हाउपाध्यक्ष सूर्यकांत मोरे, तालुकाध्यक्ष रवि सुरवसे, उपनगराध्यक्ष शाकीर खान, नगरसेवक महेश निमोणकर, अमित चिंतामणी, बिभीषण धनवडे, राजेश वाव्हळ, ज्ञानेश्‍वर झेंडे, मोहन पवार, डॉ.भगवान मुरूमकर, मनोज कूलकर्णी, गोरोबा उद्योग समूहाचे विठ्ठल आण्णा राऊत, सोमनाथ पाचरणे, उद्योगपती रमेश गुगळे, सुभाष बावर यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

जामखेड शहरातील प्राईम लोकेशनवर असलेल्या श्री अपार्टमेंटमध्ये लँडस्केपिंग गार्डन, पावरबँकअप लिप्ट, लल टीव्ही माँनेटरिंग, प्ले गार्डन, अंतर्गत रस्त्यावर स्ट्रिट लाईट, 24 तास पाणी, पंतप्रधान आवास योजनेंतर्गत क्रेडिट लिंक सबसिडी योजनेच्या लाभासह सर्व राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाईल असे यूनिकाँन डेव्हलपर्स अ‍ॅण्ड कंट्रक्शनचे संचालक नारायण राऊत यांनी सांगितले. अज्जूसेठ कोठारी, पिंटू बोथरा, जावेद मूजावर, दिपक पवार, युनूस सय्यद या तरुणांनी एकत्र येऊन पुणे मुंबईच्या धर्तीवर जामखेडच्या वैभवात भर घालणारा हा लग्झरिअस प्रकल्प सुरू केला आहे.