Breaking News

नेहरू युवा केंद्राव्दारा जागतिक महिला दिन साजरा


स्थानिक गर्दे वाचनालयाच्या सभागृहात युवा संमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम
बुलडाणा,(प्रतिनिधी): भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालया
अंतर्गत असलेल्या नेहरू युवा केंद्र बुलडाणा व्दारा जागतिक महिला दिन,
जिल्हास्तरीय युवा सम्मेलन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन 8 मार्च रोजी
स्थानिक गर्दे वाचनालयाच्या सभागृहात करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी  जिल्हा युवा समन्वयक ज्योती मोहिते या होत्या तर प्रमुख
अतिथी म्हणून प्रा.डॉ.वंदना काकडे प्रा.हरिश साखरे, गुरुदेव सेवा मंडळाचे
रामादादा देशमुख हे होते.
जिल्हा युवा समन्वयक ज्योती मोहिते यांनी सांगितले की, या वर्षीच्या
महिला दिनाचा विषय आहे. स्त्री पुरूषांचे संतुलन ठेवा. मुलगा व मुलगी
समान आहेत. स्त्रीयाँमध्ये शक्ती आहे. नियोजनाची दृष्टी आहे. प्रत्येक
आईने मुलांना महिलांचा आदर व सन्मान करण्याचे शिक्षण दयावे.  मुली
प्रमाणेच मुलांनांही कामे दया असे आवाहन या प्रसंगी केले.  डॉ.वंदना
काकडे यांनी महिलांनी मानसीक शारीरीक सशक्तीकरण व आर्थिक स्वावलंबन
आत्मसात करण्याचा प्रयत्न करावे असे आवाहन केले. रामदादा देशमुख यांनी
ग्रामगीतेतील वचनांचा दाखला देवून राष्ट्रसंताचे विचार अंगीकारण्याचे
आवाहन केले. प्रा.हरिश साखरे यांनी समयोचित मार्गदर्शन केले. या प्रसंगी
नंदनवन परिवाराच्या माध्यमातून शेतकरी आत्महत्यामधून अनाथ झालेल्या
मुलांसाठी कार्यकरणार्‍या लक्ष्मीताई दराखे, सेवा संकल्प प्रकल्पाच्या
माध्यमातून निराधार मनोरुग्ण व वृध्दांसाठी कार्य करणार्‍ची सेवा
करणार्‍या आरतीताई पालवे,  राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू अमृता जाधव व
धर्नुविद्या खेळातील आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रथमेश जावकार यांचा नेहरू
युवा केंद्राच्या वतिने सत्कार करण्यात आला. तसेच श्री.गुरुदेव सेवा मंडळ
माटरगांव ता.शेगांव या संस्थेला मान्ययवरांच्या हस्ते जिल्हा युवा मंडळ
पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या पुरस्काराचे स्वरुप रु.25000/-
प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह हे होते.
या प्रसंगी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात शाहीर बाबुसिंग राजपूत कला मंच
चे अक्षयसिंग राजपूत  व निखिल शर्मा यांचा ढोलकी सोलो, दिग्विजयसिंग
राजपूत यांचे स्फुर्तिगीत, लोकशिक्षण बहुउददेशिय सांस्कृतिक मंडळ
देऊगांवमहीचे शाहीर गजेंद्र गवई यांचा पोवाडा, अहिराणी नृत्य, लावणी
नृत्य, आई वरील नाटीका इत्यादिंचे युवांकडून सादरीकरण करण्यात आले तर
माटरगांवच्या महिलानी गायलेला गीतांनी व शेतकरी आत्महत्या वरील पथनाटयाने
सभागृह भारावून गेले. कार्यक्रमाचे वैविध्यपुर्ण संचलन
गुडइव्हीनिगंसिटीचे प्रकाशक रणजितसिंह राजपूत यांनी केले.
या कार्यक्रमाच्या समारोपीय कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ.
वंदना काकडे हया होत्या तर प्रमुख अतिथी महणून सामाजिक कार्यकर्त्या
शाहीणाताई पठाण व प्रा.डॉ. अविनाश् गेडाम हे होतेृ. सांस्कृतिक
कार्यक्रमातील सहभागींना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देवून
गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन नेहरू युवा
केंद्राचे अजयसिंग राजपूत यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या राष्ट्रमाता जिजाऊ, साविञीबाई
फुले व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस  माल्यार्पण् करुन
व्दिपप्रज्वलन करण्यात आले. तर कु.जानव्ही माडीवाले हिने उत्कृष्ट
स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धनंजय चाफेकर, अविनाश
मोरे, विजय जाधव, भावना बोरे यांनी अथक परिश्रम केले.