विद्यार्थिनींना छेडणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी


अहमदनगर /प्रतिनिधी: शहरातील शालेय विद्यार्थिनींना होणाऱ्या छेडछाडीच्या घटना, धूम स्टाईलने होणारी दागिन्यांची चोरी या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने कारवाई करावी. त्यासाठी योग्यउपाययोजना कराव्यात अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला आघाडीच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांच्याकडे केली आहे.

जिल्हा पोलिस अधिक्षक म्हणून नगरला नव्याने रुजू झालेले ईशू सिंधू यांचे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला आघाडीच्या वतीने शहर जिल्हाअध्यक्षा रेश्मा आठरे, सुनंदा कांबळे, सारीका खताडे, निर्मला जाधव, उषा मकासरे, शितल राऊत, सुनिता पाचारणे आदींच्या शिष्टमंडळाने स्वागत केले. यावेळी झालेल्या चर्चेच्या दरम्यान या शिष्टमंडळाने युवती व महिलांबाबतच्या समस्यामांडल्या.

शहराच्या उपनगरी भागात रस्त्याने जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील दागिने धूम स्टाईलने पळविण्याचे प्रकार सातत्याने सुरूच आहेत. त्यामुळे महिलांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे.तसेच टारगट तरुणांकडून महाविद्यालयीन मुलींची छेडछाड करण्याचे प्रकार शहरातील बहुतांशी महाविद्यालयांच्या गेट बाहेर होतात. त्यामुळे आज अनेक युवती या तणावात शिक्षण घेतआहेत. त्यांना भयमुक्त वातावरणात शिक्षण घेता यावे यासाठी रोडरोमियोंवर कडक कारवाई होणे आवश्यक आहे. 

या शिवाय शहरामध्ये विशेषतः माळीवाडा बसस्थानक परिसरामध्ये रिक्षा वपॅगो रिक्षाचालकांनी उच्छाद मांडलेला असून बसस्थानकांमधून येणार्‍या नागरिकांना आपल्याच रिक्षामध्ये बसवण्यासाठी त्यांच्यामध्ये चढाओढ लागलेली असते व त्यामुळे रस्त्यातच यारिक्षांचा ठिय्या मांडलेला असतो, त्यामुळे शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक यांना या परिसरातून जाणेही जिकिरीचे झाले आहे. या सर्व गोष्टींचा सारासार विचार करता यावर योगु तीकारवाई करून नागरिकांच्या समस्या दूर कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget