Breaking News

शासकीय तंत्रनिकेतनसमोर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची निदर्शने


अहमदनगर/प्रतिनिधी : “शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात शहराच्या विविध ठिकाणाहून तसेच ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. तसेच वसतीगृहात राहून विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहे. मात्र महाविद्यालयात कॅन्टीन नसल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत असून, विद्यार्थ्यांना बाहेर जाऊन जेवण, नाष्टा करावा लागत आहे. तर चुकीच्या संगतीमुळे युवक व्यसनाच्या आहारी जात असून, महाविद्यालयाच्या आवारातच कॅन्टीन सुरु केल्यास विद्यार्थ्यांची सोय होणार नाही ’’ असे निवेदन येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात येणार्‍या विद्यार्थ्यांच्या अल्पोपाहाराची सोय होण्याकरिता कॅन्टीन सुरु करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने महाविद्यालयासमोर निदर्शने करण्यात येऊन प्राचार्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शहर जिल्हा सरचिटणीस लंकेश चितळकर, सागर गाणार, शहेजाद खान, अथर्व वास्कर, प्रणव काळे, अभिषेक कर्डिले, ओंकार वाघ, भुवनेश नागुल, प्रतीक गाणार, विशाल भुसारी, आदिनाथ गीते, ओम डोके, अमन पठाण, कृष्ण भागवत, संदीप जाधव, शुभम भागवत, तेजस कुलकर्णी, अभिमन्यू गाडे, संतोष पांढरे, ओमकार धाडगे, शुभम आव्हाड आदी उपस्थित होते.