जामगावचा ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेत सहभाग


पारनेर/प्रतिनिधी: ‘पाणी फाउंडेशन’च्या सत्यमेव जयते वॉटरकप 2019 स्पर्धेत तालुक्यातील जामगाव गावाने सहभाग घेतला आहे. महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर संपूर्ण गावाने शोषखड्डे तयार करून ‘जलबँक’ उभारण्याचा संकल्प केला आहे. तसेच प्रत्येक डोंगरमाथ्यावरील पाणी अडवून जमिनीत मुरविण्यासाठी गावकर्‍यांनी पुढाकार घेण्यास सुरूवात केली आहे. 

जामगाव येथे काल (दि.4) घरोघरी वैयक्तीक ‘शोषखड्डे’ निर्माण करण्याच्या कामाला ज्येष्ठ नागरिक भाऊसाहेब बळवंत मेहेर यांच्या हस्ते सुरूवात झाली. यावेळी सरपंच अरूणा खाडे, ग्रामपंचायत सदस्य प्रसाद मेहेर, बबन मेहेर, तुकाराम खाडे, दगडू खाडे, राजेंद्र वाघमारे, सुभाष शिंदे, सुनिल शिंदे, स्वप्नील बर्वे, शंकर बांगर, ग्रा.पं.सदस्या बिजा भुजबळ, कैलास शिंदे, रमेश मेहेर, दत्तात्रय घोडे, तुषार बांगर, सागर बर्वे, नंदू शिंदे आदी उपस्थित होते. 

भयंकर दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेल्या तालुक्यातील जामगाव गावाने एकजुटीने पाणी अडविण्याचा व बचतीचा संकल्प केला आहे. जलसंधारणासाठी गावठाणातर्गत येणार्‍या कुटुंबांनी स्वत: पुढाकार घेवून शोषखड्डे उभारण्याचा मनोदय व्यक्त केला. यामुळे दररोज हजारो लिटर पाणी जमिनीत मुरून ऐन दुष्काळात बोअरवेलच्या माध्यमातून पुन्हा त्या पाण्याचा पुर्नवापर करता येणे शक्य होणार आहे. यावेळी संगमनेर येथे प्रशिक्षण घेवून आलेल्या जलमित्रांनी तसेच सरपंच खाडे यांनी या स्पर्धेचे महत्त्व सांगितले.
जलसमृध्दीसाठी गावकरी सरसावले

‘पाणी फाउंडेशन’च्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 8 एप्रिल ते 22 मे 2019 दरम्यान होणार आहे. या स्पर्धेत विजेत्या तीन गावांना प्रथम 75 लाख, द्वितीय 50 लाख आणि तृतीय 40 लाख रूपये रोख पारितोषिक मिळणार आहे. तसेच तालुक्यात सर्वोत्कृष्ट काम करणार्‍या गावाला 10 लाख रूपयांचे बक्षिस दिले जाणार आहे. जामगाव येथे 1972 पेक्षाही भयंकर दुष्काळ पडला आहे. हाताला काम राहिले नसल्याने प्रत्येकाने हातात टिकाऊ, फावडे घेवून पाणी अडवून जलसमृध्दी व बक्षिस मिळविण्यासाठी सगळे गावकरी एकजुटीने सरसावले आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget