Breaking News

सोनिया गांधी पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड


श्रीगोंदे/प्रतिनिधी : शहरातील सोनिया गांधी पॉलिटेक्निकच्या ट्रेनिंग अ‍ॅण्ड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हअंतर्गत ईलेक्ट्रॉनिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या फेल्क्सट्रॉनिक्स, ऊर्जा निर्मीतीच्या क्षेत्रातील कमिन्स व सुझलॉन, तसेच गियर बॉक्स क्षेत्रातील भारत गियर या कंपनीने सोनिया गांधी पॉलिटेक्निकच्या अंतिम वर्षात शिकत असलेल्या तब्बल 14 विद्यार्थ्यांची त्यांच्या अंतिम निकाला अगोदरच नोकर्‍यासांठी निवड केली आहे.

मागील अनेक वर्षापासून सोनिया गांधी पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना अनेक नामांकित कंपन्यामध्ये नोकर्‍या मिळवून देण्यासाठी यश मिळत आहे. वरिल कंपनीने निवड केलेल्यांमध्ये ऋषिकेश शिंदे, तुषार दरेकर, सौरभ पोकळे, सौरभ वाळके, प्रविण केाळपे, ओंकार काळे, काजल पवार, प्रतिक म्हस्के, आकाश गवळी यांचा 

समावेश आहे. वरिल विद्यार्थ्यांना प्रा. विक्रम शिंदे, प्रा. कानिफनाथ उगले, प्रा प्रविण बावधनकर, प्रा प्रविण बाबर, प्रा दिपक दरेकर, प्रा स्वप्निल निकम यांचे मार्गदर्शन लाभले.