Breaking News

शासकीय कामात अडथळाप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल


फलटण / प्रतिनिधी : फलटण-लोणंद मार्गावर 25 मार्च रोजी निवडणुकीच्या अनुषंगाने तपासणी पथकाकडून तपासणी सुरु असताना एका तवेरा गाडीला कर्मचार्‍यांनी रोखण्याचा प्रयत्न करीत असता एक कर्मचारी गाडीच्या बोनेटवर पडला. संबंधित चालकाने गाडी न थांबवता तशीच पुढे फलटणच्या दिशेने नेली. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी अज्ञात चालकाविरोधात फलटण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दि. 25 मार्च रोजी सायंकाळी ही घटना घडली असून याबाबतची फिर्याद सविता मारुती अवघडे यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली असून अधिक तपास सपोनि बी. एन. बुरशे करीत आहेत.