Breaking News

कामगार तलाठी शेतकर्‍यांचा मित्र-जाधव


दहिगाव-ने/प्रतिनिधी : गावपातळीवर शेतकर्‍यांना विविध शेती दाखले, खरेदी विक्री व्यवहार, शासकीय अनुदानीत योजना, पिक विमा व इतर शेती कामानिमित्त रोजच ग्रामीण भागाशी संपर्क असलेला कामगार तलाठी शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडवनारा शासकीय महसूल विभाग कर्मचारी शेतकर्‍यांचा एक प्रकारे मित्रच आहे. असे प्रतिपादन शेवगांव पंचायत समिती विस्तार अधिकारी रामकिसन जाधव यांनी केले.

दहिगाव-ने येथील कामगार तलाठी कमलाकर आरडले यांची बदली तर बाळासाहेब केदार यांची दहिगाव-ने येथे नवनियुक्ती झाल्याने दोन्ही कामगार तलाठी यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मार्गदर्शन करताना जाधव बोलत होते. यावेळी सरपंच सुभाष पवार, ग्रामसेवक गोटीराम मडके, चंद्रकांत जोशी, रांजणीचे प्रा.काकासाहेब घुले, प्रदीप सोनवणे, सुरेश घाणमोडे, पांडुरंग पवार, विकास कसबे, कचरू पवार, कडूबाळ घुले, रमेश जाधव, सचिन काळे, कडूबाळ माताडे, अरुण थोरात, गाडे भाऊसाहेब आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.