शासनाच्या योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेला-आ.राजळे


शहरटाकळी/प्रतिनिधी
समाजातील तळागाळातील घटकाला विकासाचा केंद्रबिंदू मानून शासनाच्या विविध लोकउपयोगी योजनांचा लाभ मिळवून देण्याचे काम होत असल्याने सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळत असल्याचे प्रतिपादन शेवगांव-पाथर्डीच्या आ. मोनिका राजळे यांनी केले.

शेवगांव तालुक्यातील शहरटाकळी व परिसरातील, दहीगाव-ने, ढोरसडे, आंत्रे, माठाचीवडी भाविनिमगाव राजंनी, मजलेशहर, देवटाकळी आदी गावातील श्रावनबाळ व संजय गांधी निराधार योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना योजनेच्या पत्राचे प्रातिनिधीक स्वरूपात आ. मोनिका राजळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी आ. राजळे बोलत होत्या. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष बापूसाहेब पाटेकर, श्रावणबाळ संजय गांधी योजनेचे तालुकास्तरीय सदस्य वाय.डी.कोल्हे, शहरटाकळीच्या प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच अलकबाई शिंदे, ताराचंद लोढे, नगरसेवक अरुण मुंडे, ऊदय शिंदे, अशोक निंबाळकर आदीं प्रमुख उपस्थीत होते.
यावेळी पुढे बेलतांना आ. मोनिका राजळे म्हणाल्या की, सरकार गोरगरीबांच्या व शेतकर्‍यांच्या हिताच्या योजना पारदर्शीपणे राबवत असून खर्‍या लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ होत आहे. विरोधकांनी कितीही बिनबुडाचे आरोप केले तरी विकासाची गंगा तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत आहे.

प्रास्ताविक भाषणात वाय.डी. कोल्हे यांनी संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना आदी प्रकरणाच्या लाभार्थ्याकडून, जनतेकडून प्रकरण मार्गी लावण्यासाठी काही तोतया मंडळी दोन हजार, एक हजार रुपये घेऊन काम करण्याचे आश्‍वासन देऊन जनतेला चुना लावण्याचे काम करतात. हे त्यांचे अनेक वर्षापासूनचे उद्योग असल्याने लाभार्थ्याची प्रकरणे अशा तोतया कडून होत नसतात, परिसरात काही तोताया लाभार्थ्याकडून पैसे उकळतात. त्यांचा या योजनेशी कसल्याही प्रकारचा सबंध नसताना गोरगरीब जनतेची लुट करून स्व:ताची आर्थिक कमाई करणार्‍या अशा तोतया एजंट पासून जनतेने सावध राहावे. असे आवाहान केले.

यावेळी कर्यक्रमास जेष्ठ नागरीक मुरलीधर गवळी, तात्याराव कावले, ग्रा.प.सदस्थ रामाप्पा गिरम, ह.भ.प.कृष्णा महाराज धनक, ह.भ.प. मोहन महाराज खंडागळे, आसाराम नर्‍हे, लक्ष्मण काशीद, विकास थोरात, मुसाभाई शेख, कल्याण जगदाळे, मुसाभाई शेख, बशीर पठान, लाभार्थी फरताळे, नानासाहेब डोळे, अजीनाथ डोळे, विठ्ठल घुले, ऊत्तम वाबळे आदींसह लाभार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget