समाजामध्ये सर्वधर्मसमभाव निर्माण झाला पाहिजे; हजरत खलील चिश्ती : पाटणला रामापुरात उरूसानिमित्त विविध कार्यक्रम


पाटण/प्रतिनिधी : सर्व जातीधर्माच्या लोकांनी एकत्रित येऊन सण समारंभ व उत्सव साजरे करण्यातूनच सामाजिक एकता रूजली जाईल. लोकांची सेवा करण्यामध्येच खर्‍या अर्थाने ईश्र्वरसेवा आहे, असे प्रतिपादन हजरत शेख मोहंमद खलील चिश्ती यांनी केले.

सर्वधर्मियांचे श्रध्दास्थान असलेल्या पीर हजरत ख्वाजा कबुल्ला हुसैनी चिष्ती यांचा रामापूर (पाटण) येथे नुकताच वार्षिक उरूस झाला. त्यानिमित्ताने आयोजित विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाच्या प्रारंभावेळी ते बोलत होते.

या वेळी शेख मोहंमद खलील चिश्ती यांनी सांगितले की, पाटणसह पुणे, मुंबई येथील काही निवडक व्यक्तींना एकत्रित घेवून समाजकार्यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. गेल्या 15 वर्षांपासून गोवा, पुणे, कोकण, पाटण अशा सहा ठिकाणी जाऊन जनसेवेसाठी वेगवेगळे कार्यक्रम घेत आहोत. त्याअंतर्गत पाटणमध्येही उरूसाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने घेतला जात आहे.

या कार्यक्रमास माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, तहुर मिया चिश्ती, पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप, उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर, मनसेचे तालुकाध्यक्ष गोरख नारकर, दादा शिंगण, भाजपचे तालुकाध्यक्ष फत्तेसिंह पाटणकर, धनराज शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमादरम्यान गरिब व अनाथ मुलांसह व मुकबधिर बालकांना शालोपयोगी वस्तू, ब्लँकेट व इतर वस्तुंचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. त्यानंतर खानखा हजरत ख्याजा गरिब नवाज बंदे नवाज गेसू दराज यांच्या सौजन्याने महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते.
रात्री उशिरा आंतरराष्ट्रीय स्तरावरील निजामी बंधू यांच्या कव्वालीचे नियोजनही केले होते. या कव्वाली कार्यक्रमालाही नागरीकांचा उत्सफूर्त प्रतिसाद लाभला.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget