Breaking News

उद्या नगरमध्ये सरगम संगीत महोत्सव


अहमदनगर/प्रतिनिधी: नगर शहराच्या सांगितिक क्षेत्रातील सरगमप्रेमी मित्र मंडळाच्या वतीने उद्या व रविवारी असे दोन दिवसीय ‘सरगम संगीत महोत्सवा’चे आयोजन केले आहे. महोत्सवा दरम्यान सुप्रसिद्धगायिका सुरुचि धूत-मोहता व हरिदास शिंदे यांना त्यांच्या सांगितीक क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘सरगम सन्मान’ देवून गौरविण्यात येणार आहे. अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रा.राम शिंदे वकार्यक्रम प्रमुख महेश कुलकर्णी यांनी दिली.

सावेडी येथील माऊली सभागृहात सायंकाळी 6 ते 9 या वेळेत हा महोत्सव होईल. महोत्सवात कलाकार कपिल जाधव यांचे सुंद्रीवादन, हरिदास शिंदे व अवधूत गांधी यांच्या ‘संत वाङमयातीलमार्गी संगीत’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अच्युत सुतार यांचा स्वतंत्र तबला वादनाचा कार्यक्रम,.कस्तुरी दातार अट्रावलकर यांच्या शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाचा कार्यक्रमआयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन कार्यक्रमाचे सहप्रमुख मनिष बोरा, उपाध्यक्ष पवन नाईक व सरगमच्या पदाधिकार्यांनी केले आहे.