Breaking News

महिलांनी आत्मनिर्भर होवून स्वत:ला विकसीत करावे : रूपल मेहता

 
चिखली,(प्रतिनिधी): महिलांमध्ये जी शक्ती असते, त्या शक्तीचा योग्य तो वापर त्यांच्याकडून जीवनात व्हावा. महिलांना सस्कृती, परंपरा जतन करण्याची प्रगल्भता उपजतच मिळालेली असते. त्याचा प्रत्यय आज या स्पर्धे निमित्त उपस्थित प्रेक्षकांना आला, तो वर्षभर साजरे होणारे विविध सण एका दिवसात एकाच मंचावर बघण्याचा आनंद हिरकणी गृपने मिळवुन दिला त्यातुन आला आहे. 

वर्षाच्या सुरूवातीला गुढीपाडव्यापासून तर वर्षाच्या शेवटी होळी पर्यंत साजरे होणारे सण प्रेक्षकांना एकाच वेळी, एकाच ठिकाणी बघता आले. हा योगायोग कार्यक्रमाचे आयोजन करणार्‍या उत्साही स्पर्धकांमुळे हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठाणच्या सौजन्याने येथे साजरा झाला व त्यात स्पर्धेकांना कौतुकाची थाप प्रेक्षकांकडून मिळाली, असे उद्गार कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलतांना प्रतिष्ठाणच्या संस्थापक अध्यक्षा अ‍ॅड.वृषालीताई बोंद्रे यांनी काढले. हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठाणच्या वतीने जागदीक महिला दिनाचे औचित्य साधुन ‘उत्सव सणांचा’ हया आगळया वेगळया स्पर्धेचे आयोजन चिखली शहरात 11 मार्च रोजी मौनीबाबा संस्थानमध्ये करण्यात आले होते.

 या कार्यक्रमाचे उद्घाटक मिसेस इंडिया युनिवर्स 2019 विजेत्या रूपल मेहता यांच्या शुभहस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठाणच्या अ‍ॅड.वृषालीताई बोंद्रे हया होत्या. तर प्रमुख उपस्थिती मध्ये माजी आमदार रेखाताई खेडेकर, महिला काँगे्रस जिल्हाध्यक्षा ज्यातीताई ढोकणे, उपाध्यक्षा जिल्हा काँगे्रस डॉ.स्वातीताई वाकेकर, स्वातीताई पर्‍हाड, दक्षाताई मोदे, डॉ.मिनाताई सोसे, डॉ.कु.गायत्री सावजी, यांची उपस्थिती होती. यावेळी विशेष उपस्थितीमध्ये नगरसेविका संगिताताई गाडेकर, शालीनीताई थोरात, सुनिताताई शिंगणे, माजी नगराध्यक्षा शोभाताई सवडतकर, अरूणाताई कदम, करूणाताई बोंदे्र, प्रमिलाताई जाधव यांची उपस्थिती होती. उद्घाटक मिसेस इंडीया युनिवर्स 2019 विजेत्या रूपल मेहता यांनी कार्यक्रमाला उपस्थित महिलांना संबोधीत करतांना, महिलांनी त्यांच्यासाठी असलेल्या विविध क्षेत्रात असलेल्या संधी पादांक्रांत करण्यासाठी स्वत: मधील कलागुण विकसीत करण्यावर भर दिला पाहीजे. त्यासाठी महिलांनी आत्मनिर्भर बनवून या संधीचा फायदा करून घेतला पाहीजे, जेणेकरून महिलांच्या आकांक्षासाठी गगन ठेंगने असल्याचे जगाला दिसुन येईल. आणि निश्‍चितच तेव्हढी क्षमता महिलांत आहे असे आत्मविश्‍वास पुर्वक सांगितले.

 संपन्न झालेल्या या स्पर्धेत एकुण 18 महिला गृपने सहभाग नोंदविला होता. सणाच्या साजरी करणात 15 ऑगस्ट व 26 जानेवारी या राष्ट्रीय सण उत्कृष्ठपणे सादर करून नवदुर्गा गृपने प्रथम पारितोषीक पटकावले. कुहिरे गृपने शिवजयंतीचा उत्सव साजरा करून दुसरे बक्षिस पटकाविले. शिवजयंती साजरी करतांना शिवबाचा जन्म, शिवाजीचे बालपन, आणी राज्यभिषकाचा सोहळा, अशा तिनही महत्वपुर्ण घटना सादर केल्या गेल्या. तर कोळी बांधवांची समुद्रावरील श्रध्दा, कोळी नृत्य सादर करून कोळी बांधवांचा नारळी पोर्णीमा हा सण सादर करीत विरशैव समाज महिला मंडळाने तिसरे बक्षिस मिळविले. उत्तेजनार्थ विजेत्या गृपमध्ये शिवण्या गृपने महाशिवरात्री कावड यात्रेचे उत्कृष्ठ सादरीकरण केले. अवनी गृपव्दारे बुध्दपोर्णिमा हा सण सादर करीत उत्तेजनार्थ दुसरे बक्षिस मिळविले. तर तिसरे उत्तेजनार्थ बक्षिस मिळविणार्‍या शिवगृपने सकरूबा या उत्सवाचे सादरीकरण केले. उत्तेजनार्थ चौथे बक्षिस मिळविणार्‍या माउली गृपने आषाढी एकादशी तर माउली भजनी मंडळ गृपव्दारे सभामंचावर दिवाळी हा सण साजरा करून पाचवे उत्तेजनार्थ बक्षिसे मिळविले. तर खंडाळा मकरध्वज येथील मुक्ताबाई गृपने गजानन महाराज प्रगट दिनाचा सोहळा सादर करून प्रोत्साहनपर बक्षिस प्राप्त केले. स्पर्धेतील वियजी स्पर्धकांना प्रथम बक्षीस 2100 रूपयाच्या भेटवस्तु, व्दितीय बक्षिस 1500 रूपयाच्या भेटवस्तु व तृतीय बक्षिस 1100 रूपयाच्या भेटवस्तु शिल्पा लढ्ढा यांच्या वतीने देण्यात आली. तर उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आले. कार्यक्रमासाठी 800 च्या वर उपस्थिती होती. 

कार्यक्रमात प्रशिक्षक म्हणुन डॉ.कु.गायत्री सावजी, स्वातीताई पर्‍हाड, दक्षाताई मोदे, डॉ.मिना सोसे, यांनी जबाबदारी पार पाडली. उत्कृष्ठ वेशभुषा करून कार्यक्रमाचे संचलन छाया काच्छवाल व गिता भोजवानी यांनी केले. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष ज्येातीताई बियाणी, उपाध्यक्ष शोभाताई सवडतकर, कोषाध्यक्ष मंगला देशमाने, सचिव मनिषा बोंद्रे, प्रसिध्दी प्रमुख प्राची महाजन, सहसचिव सोनाली सुराणा, साधना पेटकर, वनिताताई साखळकर, सुष्मा टेहेेरे, डॉ.अंजली कमळस्कर, अनुजा डहाळे, अमृता डहाळे, शिल्पा लढ्ढा, कविता भोजवानी, कल्पना खरात, विद्या देशमाने, आर्चना बोंद्रे, रेखा देशमुख, सविता खरात, सिमा चित्ते, शोभा सपकाळ, अनिता घुगे, शंकुतला झगडे, अमृता डहाळे, मोनीका डहाळे, सुनिता गायकी, रेणुका मुंडलीक, मोनीका राठी, रूपा राठी, छाया शेटे, शितल ठाकुर, आश्‍विनी भराड, माया जाधव, जयश्री देशमाने, मनिषा भुते, अरूणा कदम यांनी परिश्रम घेतले.