Breaking News

शिवसेनेच्या नेत्यांनी हणबरवाडी धनगरवाडी योजनेची चेष्टाच केली : बाळासाहेब पाटील


मसूर/प्रतिनिधी : शिवसेना-भाजपच्या राजकीय श्रेयवादात हणबरवाडी-धनगरवाडी पाणी योजना गेल्या साडेचार वर्षात रखडली. या योजनेसाठी राष्ट्रवादीचाच सातत्याने पाठपुरावा केल्याने त्याचे खरे श्रेय राष्ट्रवादीचेच आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या एका नेत्याने एका कार्यक्रमात ही योजना कराड उत्तरमधील जनतेला भेट देतो, असे म्हणण्याऐवजी शिवसेनेच्या एका कार्यकर्त्याला वाढदिवसाची भेट दिल्याचे बेताल वक्तव्य केले. त्यामुळे भागातील जनतेची व योजनेची चेष्टा केल्याचा आरोप आमदार बाळासाहेब पाटील यांनी केला.

रिसवड (ता. कराड) येथे सुधाकर रामुगडे यांची स्व. पी. डी. पाटील बँकेच्या संचालकपदी सदाशिव शिंदे, तानाजी इंगवले यांची रिसवड अंतवडी सोसायटीच्या चेअरमन व्हाईस चेअरमन पदी निवड व माजी सैनिक व गुणवंतांच्या भव्य सत्कार समारंभप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे सदस्य मानसिंगराव जगदाळे होते. यावेळी उपसभापती सुहास बोराटे, माजी सभापती देवराज पाटील, स्व. पी. डी. पाटील बँकेचे चेअरमन सागर पाटील, संचालक बाळासाहेब जगदाळे, सह्याद्रीचे संचालक लहुराज जाधव, संजय जगदाळे, माणिक पाटील, तानाजी जाधव, भाऊसाहेब चव्हाण, डॉ. विजय साळुंखे, उध्दवराव फाळके, व्ही. एम. पोळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

सूत्रसंचालन महेश इंगवले यांनी केले. प्रास्ताविक प्रकाश इंगवले यांनी केले. तर आभार रमेश शिरतोडे यांनी मानले.