Breaking News

महिलांनी आहार आणि आरोग्याविषयी जागरूक राहावे - नेहा जाधव


पुसेगाव /प्रातिनिधी : महिलांना अनेकवेळा वेगवेगळ्या जबाबदार्‍या सांभाळून काम करावे लागते. त्यामुळे अनेकदा आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते सुरवातीला छोट्या वाटणार्‍या व्यादी भविष्यकाळात त्रासदायक ठरत आसतात. आरोग्याबरोबरच आहाराबाबत जागुरूक राहून लक्ष दिल्यास महीला या मनाने कणखर होतील, असे मत सौ. नेहा जाधव यांनी व्यक्त केले.

महिला दिनानिमित्ताने हिंदवी महिला बचतगटाच्या वतीने आयोजित केलेल्या स्नेह मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी अध्यक्षा किर्ती सुर्यवंशी आणि सचिव सुरेखा बोराटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सौ. नेहा जाधव म्हणाल्या, दिवसभर घरातील कष्टाची कामे करणार्‍या महिलांनी सकस आहार घेणे गरजे आहे. दिवसभर उर्जा टिकवून ठेवण्यासाठी सकाळीच पोटभर जेवण केले पाहीजे. सकाळचा नास्ता टाळून पुर्ण पोटभर आहार घेणे आरोग्यदायक आहे, असे मत त्यांनी मांडले.

यावेळी अध्यक्षा किर्ती सुर्यवंशी म्हणाल्या महिलांनी आपल्या कलाकुसरीला वाव देऊन त्याचे रोजगारात रूपांतर केले पाहीजे. तर माधूरी व्हावळ म्हणाल्या, सोशल मिडीयाचा प्रभावीपणे वापर करून महिलांनी आपल्या ज्ञानाच्या कक्षा रूंदवल्या पाहीजेत. सुरेखा बोराटे,लता सुर्यवंशी यांनीही आपले मत व्यक्त केले यावेळी सुजात नलवडे, मनिषा मुळे, पुजा जगताप, अनिता सुर्यवंशी, निर्मला गायकवाड यांच्यासह सर्व महिला सदस्या उपस्थित होत्या.