Breaking News

व्याघ्र प्रकल्पातील गावांनी विकास साधावा डॉ. विनिता व्यास


कराड,दि. (प्रतिनिधी) : डॉ.शामाप्रसाद मुखर्जी हि महिला सबलीकरण व ग्रामस्थांना शाश्वत रोजगार मिळवून देणारी योजना आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन मधील गावांनी या योजनेत आपला सहभाग नोंदवून आपल्या गावाचा व आपला विकास साधावा असे प्रतिपादन सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालिका डॉ. विनिता व्यास यांनी केले.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कोल्हापूर यांचे सहकार्याने उधवणे येथे परिसंवाद व हळदी-कुंकू समारंभ कार्यक्रम आयोजित केला होता. सदर कार्यक्रमासाठी ढेबेवाडी विभागातील अंगणवाडी सेविका,आशा सेविका,ग्रामपंचायत सदस्या, भाजपाच्या महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा कविता कचरे, कविता मुळे, डॉ.संध्या साळुंखे, संध्या बेंद्रे या मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम रूपाली साळुंखे, प्रेमा साळुंखे, संगिता शिर्के, उज्वला साळुंखे, संगिता साळुंखे, निलम साळुंखे यांनी आयोजित केला होता. भाजपा जिल्हा महिला अध्यक्षा कविता कचरे यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली व बचत गट कसे चालवावेत यासाठी मार्गदर्शन केले. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी विजय साळुंखे सरपंच उधवणे यांचे प्रयत्न अतिशय कैस्तूकास्पद आहे.