Breaking News

वडाचे म्हसवे पंचायतीवर श्रीजननीदेवी पॅनेलचे वर्चस्ववडाचे म्हसवे पंचायतीवर श्रीजननीदेवी पॅनेलचे वर्चस्व


कुडाळ / प्रतिनिधी : जावळी तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या वडाचे म्हसवे ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पंचायत समितीच्या माजी सभापती व विद्यमान सदस्या सौ. अरूणा शिर्के यांच्या श्री जननीदेवी ग्रामविकास पँनेल गटाने विरोधी काळुबाई ग्रामविकास पँनेल गटावर मात करित 9 पैकी 8 जागांवर दणदणीत विजय मिळवला. 

म्हसवे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी त्यांच्याच गटाच्या सौ. विजया नामदेव पवार यांनी 301 मतांनी विजय संपादन करित ग्रामपंचातीवर निर्वावाद वर्चस्व राखले. वडाचे म्हसवे ग्रामपंचायतीच्या एकुण 10 जागांसाठी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत 3 जागा मतदानापुर्वीच बिनविरोध निवडून आल्याने व एक जागा रिक्त राहील्याने एकुण 6 जागांसाठी प्रत्यक्ष मतदान झाले. त्यामध्ये जननीदेवी ग्रामविकास पँनेलचे एकुण 8 उमेदवार विजयी झाले असून विरोधी काळुबाई ग्रामविकास पँनेल गटाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. 

विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे - अशोक साहेबराव शिर्के, राणी पोपट चव्हाण, प्रशांत पोपट शिर्के, अनिता विजय शिर्के, लक्ष्मण गणपत शिर्के, तर सरपंचपदी सौ. विजया नामदेव पवार आदी उमेदवार विजयी झाले तर अनिता जयवंत चव्हाण, रेखा रामचंद्र पवार, व अनिता संजय गुरव आदी तीन सदस्या बिनविरोध निवडून आले आहेत. जावळीच्या माजी सभापती अरूणा शिर्के व त्यांचे पती अजय शिर्के यांनी संजय शिर्के, रविंद्र शिर्के व यशवंत शिर्के यांच्या सहकार्यातून जननीदेवी ग्रामविकास पँनेलचे नेतृत्व केले होते तर जावळीचे माजी उपसभापती तानाजी शिर्के यांच्या पाठिंब्याने कृष्णा शिर्के, नवनाथ शिर्के आदींनी विरोधी काळुबाई ग्रामविकास पँनेलल गटाचे नेतृत्व केले होते, सर्व विजयी उमेदवारांचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी अभिनंदन केले. 

माझ्या व माझ्या पतींच्या विरोधात अपात्रतेसाठी नको तो खटाटोप केले होते व खोट्या तक्रारीही दाखल करून बदनाम करण्याचा कुटील डाव खेळला होता मात्र गावातील सुज्ञ जनतेने आमच्यावर विश्र्वास दाखवून ग्रामपंचायतीची निविर्वाद सत्ता आमच्याकडे सोपवून आजच्या निकालाने विरोधकांना चांगलीच चपराख दिली आहे, अशी प्रतिक्रिया जावळीच्या माजी सभापती अरूणा शिर्के यांनी दैनिक लोकमंथनशी बोलताना व्यक्त केली आहे.