Breaking News

आत्मा मालिकचे तीन विद्यार्थी पोलिस उपनिरीक्षकपदी


कोपरगाव/प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने २०१६ मध्ये पोलिस उपनिरीक्षक पदाच्या घेतलेल्या स्पर्धा परीक्षांमध्ये कोकमठाण येथील आत्मा मालिक करिअर अँकेडमीच्या अमोल बोरसे , प्रियांका आठरेव महेश नागरे यांनी घवघवीत यश संपादन केले. या तीनही विद्यार्थ्यांची पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाली .

या विद्याथ्र्यांचे सद्गुरू आत्मा मालिक माऊली, संत परमानंद महाराज, संत निजानंद महाराज, अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, अँकेडमीचे संचालक नागेश गायकवाड, उपाध्यक्ष भगवान दौंड,सरचिटणीस हनुमंत भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठल होन, विश्वस्त आबासाहेब थोरात, वसंतआव्हाड,प्रभाकर जमधडे,माधव देशमुख आदिंनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.