Breaking News

राफेलच्या फायली चोरल्या नेहरूंनी!


नगर / प्रतिनिधीः
कशाचाही दोष द्यायचा असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी गेल्या काही दिवसांपासून पंडित जवाहरलाल नेहरू हे हक्काचे नाव झालं आहे; पण याच नेहरू प्रेमाने सध्या भाजपची कोंडी करून ठेवली आहे. राफेल व्यवहाराच्या फाईल गहाळ झाल्याच्या प्रकरणात या फाईल नेहरूंनीच चोरल्याचे सांगत ‘सोशल मीडिया’वर मोदी आणि भाजपवर प्रचंड ट्रोलसुख घेतले जात आहे.

राफेल डीलमधील महत्त्वाची कागदपत्रे चोरीला गेल्याची माहिती समोर आल्यानंतर ‘नेटीझन्स’नी भाजपला ट्रोल केले आहे. राफेल कराराराच्या फायली चोरीला जाण्यामागे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आहेत का, असा सवाल ‘नेटीझन्स’नी भाजपला केला आहे. ‘सोशल मीडिया’वर यासंबंधीचे अनेक ‘मिम्स’ व्हायरल होत आहे.