Breaking News

काळे व शिवाजी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड


कोपरगाव ता/प्रतिनिधी: कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील सुशिलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व छ्त्रपती शिवाजी विद्यालय ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या नौकरी मेळाव्यामध्ये 75 विद्यार्थ्यांची निवड झाली असल्याची माहिती छ्त्रपती शिवाजी विद्यालय ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य सुखदेव काळे यांनी दिली आहे. 

छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या ज्युनियर कॉलेजमध्ये मंगळवारी दि.5 मार्च रोजी नौकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या नौकरी मेळाव्यासाठी स्काय प्लेसमेंट औरंगाबादचे प्रतिनिधी तांदळे, खुर्दे उपस्थित होते. त्यांच्या मार्फत धुत ट्रान्समिशन प्रा.लि., लक्ष्मी अग्नी कॉम्पोनंट प्रा.लि., गामा टेक्नो प्लास्ट प्रा.ली.औरंगाबाद आदी नामांकित कंपनीमध्ये सुशिलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या 30 व छ्त्रपती शिवाजी विद्यालय ज्युनियर कॉलेजच्या 45 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे माजी आ. अशोकराव काळे, आशुतोष काळे, यांनी अभिनंदन केले आहे.