जामखेड शहरात झोपडपट्टी धारकांचा तहसील कार्यालयावर मोर्चा


जामखेड/प्रतिनिधी
जामखेड शहरातील आरोळे वस्तीवरील झोपडपट्टीतील 1976 पासून रितसर रहिवासी असणार्‍या शेकडो लोकांची घराची जागा आम्ही विकत घेतली असून मोजमाप करत ही जागा खाली करा असे काही लोक सांगत आहेत. आपल्या हक्काच्या घरावर कूरहाड कोसळणार या भीतीने हजारो झोपडपट्टी धारकांनी रविवारी तहसीलवर दि.10 मार्च रोजी सकाळी 12.30 वा घर, जागा आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, आम्हाला न्याय द्या. अशा घोषणा देत झोपडपट्टी पासून दिड किलो मिटर चालून तहसीलवर मोर्चाद्वारे आले.

यावेळी तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की, जामखेड येथील ग्रामीण भागातील भूमिहीन मजुरांना घरासाठी जागा देण्याची योजना शासनामार्फत राबविण्यात येऊन दि. 6 मे 1976 रोजी तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार तहसीलदर यांनी 45 ते 50 घराना मंजुरी देण्यात आली. व त्याबाबतचे कागदपत्रे उपलब्ध असताना 1 हजार ते दीड हजार लोकवस्ती असलेल्या मिळकतीवर चंद्रकात मुरलीधर आजबे व रमेश मुरलीधर आजबे हे चुकीची खरेदीखताच्या आधारे शासनाने दिलेल्या मिळकतीवर हे लोक बेकायदेशीरपणे आमच्या घरावर कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहेत. जर आमचे हक्काचे घर पाडुन बेघर केले आम्हाला हुसकावून लावले तर आम्ही कुटुंबियांसह उघड्यावर येवू आमचा संसार उघडयावर येईल. त्यामुळे आम्हाला शासनाने दिलेल्या जागेवरील घरे उध्वस्त करू नये शासनाने याचा सहानुभूतीने विचार करून संबंधितांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी. असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर झोपडपट्टीत राहणार्‍या शेकडो लोकांच्या सह्या आहेत. यावेळी साहयक पोलिस निरीक्षक निलेश काबंळे यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.


सदर झोपडपट्टीत 44 वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्या हस्ते जागेचे प्लाँटींग करून गरीब लोकांना इंदिरा आवास योजनेंतर्गत घरकूल बांधून दिले आहेत. रितसर पुनर्वसन झालेले आहे. या लोकांना उठवणारांची तहसिलदारांनी चौकशी करावी-प्रा.मधूकर राळेभात


झोपडपट्टीतील लोकांना बेकायदेशीर रितीने बेघर करण्याचा डाव यशस्वी होऊ देणार नाही. सर्व कागदपत्रे रितसर आहेत. याबाबत पालकमंत्री राम शिंदे यांच्याशी याविषयी माहिती देऊन झोपडपट्टीधारकांच्या न्यायासाठी मी नगराध्यक्ष म्हणून या गरीब लोकांच्या पाठिशी कायम उभा आहे.- निखिल घायतडक- नगराध्यक्ष

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget