Breaking News

सुसंकृत संतती हीच खरी संपत्ती - ह.भ.प. पाटील


पारनेर / प्रतिनिधी: समाज संस्कारा अभावी लयाला जातो. समाजास चांगल्या वळणावर आणण्यासाठी संस्कार महत्वाचे आहेत. त्यासाठी सुसंस्कारीत पिढी तयार होणे हीच खरी संपत्ती आहे असे प्रतिपादन हभपआप्पासाहेब पाटील ( औरंगाबाद ) यांनी केले. विरोली येथील गणपती चौफुला गणपती मंदिरात आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात अयोजित किर्तनमालेत ते बोलत होते . यावेळीसंतसाहीत्याचे अभ्यासक युवा किर्तनकार बाळकृष्ण महाराज कांबळे यांच्यासह परिसरातील भाविक मोठया प्रमाणात उपस्थित होते .

ह.भ.प. पाटील पुढे बोलताना म्हणाले की अध्यात्माच्या संस्काराने जीवन कृतार्थ होते . अशी संतती निर्माण करा की परमेश्वरलाही हेवा वाटावा .हा आनंद चिरकाल टिकणारा असेल.