Breaking News

प्रवरा विद्यानिकेतन शाळेचे यश


कोल्हार/ वार्ताहर :

फत्याबाद येथील प्रवरा विद्यानिकेतन मधील इ. आठवीमधील क्षितिजा राजेंद्र गाढे व आर्यन अशोक पंडित या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदयांच्यामार्फत घेतलेल्या एन. एम. एम. एस राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले. या विद्यार्थ्यांनाविद्यालयाचे प्राचार्य दीपक डेंगळे व शिक्षकांचे केंद्रप्रमुख भिमाजी गाढे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या यशाबद्दल फत्याबाद चे सरपंच शंकरराव वरखड वस्थानिक स्कूल कमिटीचे सर्व सदस्य व पालकांनी अभिनंदन केले .