Breaking News

खटावला भाजपा जोमात..राष्ट्रवादी कोमात


राजकीय वार्तापत्र / खटाव प्रतिनिधी : खटाव ग्रामपंचायतीच्या राजकिय रणसंग्रमात माजी जिल्हा परिषद सदस्य व उद्योजक महेश शिंदे यांनी भाजपाचा झेंडा हाती घेवून परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून राष्ट्रवादी पक्षाच्या ताब्यात गेल्या 20 वर्षापासून असलेली खटाव ग्रामपंचायत एकहाती घेतली. खटावच्या जनतेने महेश शिंदेंवर दाखविलेला विश्वास पाहाता आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांच्यापुढे एक कडवे आव्हान आता उभे राहिले आहे.
 
कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांना येत्या विधानसभा निवडणूकीत चितपट करण्याचा इरादयाने राजकीय मैदानात उतरलेले भाजपाचे युवा नेतेे महेश शिंदे यांनी एक आव्हान उभे केले आहे. खटाव तालुक्यातील व कोरेगाव विधानसभा मतदार संघातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या निवडणूकीत भाजपापक्षाने बाजी मारत राष्ट्रवादी पक्षाचा साफसुफडा केला आहे. या निवडणूकीकडे संपूर्ण जिल्हयाचे लक्ष वेधले होते. आगामी विधानसभा निवडणूकीत कोरेगाव मतदारसंघावर कोणाची पकड अधिक मजबूत राहणार यासाठी खटाव ग्रामपंचायतीचा निकाल महत्वपूर्ण मानला जात होता. अखेर भाजपाच महेश शिंदे यांनी जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल पाटील यांच्या सहकार्याने परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या पिपळेश्वर पॅनेलचा धुव्वा उडविला. या निकालामुळे राष्ट्रवादीच्या गोटात मात्र चितेचे वातावरण निर्माण झाले आहे. 

सन 2019च्या होणार्‍या विधानसभा निवडणूकीसाठी आमदार शशिकांत शिंदे याना हा धोक्याचा इशाराचा या माध्यमातून जनतेनी दिला असल्याचे या मतदार संघात बोलले जात आहे. भाजपाचे महेश शिंदे यांनी आता संपूर्ण मतदार संघात सुरु ठेवलेला जनसंपर्क पाहाता नजीकच्या काळात आमदार शशिकांत शिंदेंची डोकेदुखी वाढणार आहे हे निश्चित त्यातच महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून खटावच्या सर्वागिण प्रगतीसाठी लाभत असलेला विकास निधी पाहाता या मतदार संघात भाजपाचे महेश शिंदेचे राष्ट्रवादी पक्षाला कडवे आव्हान देणार याची जाणीव आता राष्ट्रवादी पक्षाचे शशिकांत शिंदेना जाणविली आहे. महेश शिंदेना या मतदार संघात लाभत असलेला जनाधार हा भविष्यात आमदार शशिकांत शिंदे साठी अडचणीचे ठरणार असे राजकीय जाणकाराचे मत आहे तुर्ततरी खटाव ग्रामपंचायत निवडणूकीत बाजीगर ठरलेले भाजपाचे महेश शिंदे याची राजकीय घोडदौडीला लगाम कसा घालावयाचा या चितेंने राष्ट्रवादी नेते मंडळी ग्रासले आहेत. त्यातच पिपळेश्वर पॅनेलच्या माध्यमातून गेली 20 वर्ष सत्ता अबाधित ठेवणारे प्रदिप अण्णा विधाते याना या निकालामुळे मोठा धक्का बसला आहे. 

खटावच्या राजकिय वर्तुळात ही मोठी घटना मानली जात आहे. परिवर्तनाच्या लाटेत पिपळेश्वर पॅनेलच्या अनेक दिग्गजाना पराभव पत्करावा लागला आहे. खटावमधील या ऐत्याहासिक झालेल्या बदलातील विजयामुळे मात्र भाजपाचे महेश शिंदे यांचा आत्मविश्वास खूप वाढला आहे. भाजपचे महेश शिंदे यांची राजकिय झंझावात पाहाता राजकिय क्षेत्रातील अनेक दिग्गजाचा त्याना पाठबळ लाभत आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी महेश शिंदे याना राजकिय बळ दिल्याने कोरेगांव मतदार संघातील चित्र बदलत आहे. त्यामुळे कोरेगांव मतदार संघातील विधान सभेची निवडणूक मात्र रंगतदार रंगणार हे चित्र स्पष्ट होत आहे.

राष्ट्रवादीच्या बालेकिल्यात भाजपचे कमळ फुलले हे झालेले परिवर्तन पाहाता राष्ट्रवादीच्या गोटयात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विशेष लक्ष राहीलेल्या या ग्रामपंचायतीचे झालेले पानिपत पाहाता याचा अहवाल कोरेगांव संघाचे आमदार शशिकांत शिंदे व खटावचे नेते प्रदिप विधाते याना दयावा लागणार आहे.