Breaking News

‘हिटमॅन’च्या नावावर 'नकोसा' विक्रम


मुंबई/प्रतिनिधी: भारतीय संघाने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर मात करत मालिकेत विजयी घौडदौड केली होती. परंतु दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाची अतिशय वाईट अवस्था झाली आहे. कर्णधार विराट कोहलीचा अपवाद वगळता एकही फलंदाज ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा नेटाने सामना करु शकला नाही. सलामीवीर रोहित शर्मा भोपळाही न फोडता माघारी परतला. पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात रोहितने सीमारेषेवर उभ्या असलेल्या झॅम्पाला झेल दिला. मायदेशात खेळत असताना शून्यावर बाद होण्याची रोहित शर्माची ही पहिलीच वेळ ठरली आहे.

रोहित शर्मासोबत शिखर धवन, अंबाती रायुडू, केदार जाधव, महेंद्रसिंह धोनी हे खेळाडूही फारशी चांगली कामगिरी करु शकले नाही. मधल्या काळात विजय शंकर आणि विराट कोहलीने भागीदारी रचत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र तो माघारी परतल्यानंतर भारतीय डावाची पुन्हा एकदा घसरगुंडी उडाली.