Breaking News

कराडला मुख्याध्यापकांचे प्रशिक्षण उत्साहात


कराड / प्रतिनिधी : कराड पंचायत समिती व अचिव्हर्स संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या शाळा व्यवस्थापन समितीचे सचिव तथा मुख्याध्यापकांचे तालुकास्तरीय एक दिवसीय प्रशिक्षण येथील एसजीएम महाविद्यालयात नुकतेच उत्साहात संपन्न झाले.

प्रशिक्षणाच्या प्रारंभी पंचायत समितीचे उपसभापती सुहास बोराटे, माजी उपसभापती, सदस्य रमेश देशमुख, पंचायत समितीचे सदस्य रमेश चव्हाण, गटविकास अधिकारी डॉ.आबासाहेब पवार, अचिव्हा संस्थेचे संचालक रणजित शेवाळे, गणेश कोळी तसेच शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक उपस्थित होते.

या प्रशिक्षणाच्या दरम्यान महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम निर्मिती मंडळ, पुणे व महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे येथील संचालक डॉ. सुनिल मगर यांनी प्रशिक्षणास भेट दिली. प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी केंद्रप्रमुख हणमंत पवार, मुख्याध्यापक युवराज बागूल, गंगाराम मोरे, शंकर सुतार, संतोष होळ व अचिव्हा संस्थेचे कर्मचारी, शिक्षण विभाग, पंचायत समिती, कराड यांनी परिश्रम घेतले. स्वागत आनंद पळसे यांनी, तर जमिला मुलाणी यांनी आभार मानले.