Breaking News

ज्ञानेश्‍वरी जगाला मार्गदर्शक -आचार्य कांडेकर


माळवाडगाव/ वार्ताहर: जगाच्या पाठीवर अनेक ग्रंथ आहेत, पण त्यापैकी ज्ञानेश्‍वरी जगाला सर्व प्रमाणे मार्गदर्शक आहे, असे प्रतिपादन आचार्य शुभम महाराज कांडेकर यांनी निपाणी वाडगाव येथे चालू असलेल्या ज्ञानेश्वरी निरुपण सोहळ्यात केले.

भगवद्गीता हे मोठ्या प्रमाणावर वाचले जाणारे अस्तिक्यवादी विज्ञान आहे व याचा सारांश गीता महात्म्यामध्ये दिला आहे. त्या ठिकाणी सांगण्यात आले आहे की, मनुष्याने भगवान श्रीकृष्णाच्या भक्तांच्या मदतीने भगवद्गीतेचे अत्यंत काळजीपूर्वक अध्ययन केले पाहिजे आणि याप्रकारे वैयक्तीक हेतुपूर्वक अर्थ न लावता कृष्ण भक्तांकडून ती समजून घेतली पाहिजे. भगवद्गीता ही कोणत्या पद्धतीने जाणून घ्यावी याबद्दलचे स्पष्ट उदाहरण गीतेमध्येच आहे व ते म्हणजे अर्जुन होय. त्याने भगवद्गीता प्रत्यक्ष भगवंताकडून श्रवण करून जाणून घेतली आहे. असेही ते म्हणाले. यावेळी सर्व ग्रामस्थ तसेच मोठ्या प्रमाणावर भाविक उपस्थित होते.