घनश्याम शेलार यांची पुन्हा घरवापसीश्रीगोंदे/प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष व शिवसेनेचे जिल्हा समन्वयक घनश्याम शेलार यांनी आपल्या समर्थकांसह पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला असून घनश्याम शेलार यांना पवार साहेबांनी विधान परिषदेचा शब्द दिला असल्याची माहिती शेलार समर्थक शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख संजय आनंदकर यांनी दिली आहे.

घनश्याम शेलार यांची राजकीय सुरुवात शिवसेनेतून केली होती. काही दिवसातच त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून अनेक वर्षे काम केले. सन 1999 च्या लोकसभा निवडणूकीत भारतीय जनता पार्टी कडून उमेदवारी मिळवून कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे प्रचाराची पहिली सभा घेतल्यानंतर भारतीय जनता पार्टीने शेलार यांची लोकसभेची उमेदवारी कापून दिलीप गांधी यांना दिली. त्यामुळे नाराज झालेल्या शेलार यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत श्रीगोंदे येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादीमध्ये असताना त्यांनी एसटी महामंडळाचे सदस्य साईबाबा संस्थानचे उपाध्यक्ष तसेच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पदही भूषविले आहे. श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे राहुल जगताप हे विद्यमान आमदार असल्याने 2019 विधानसभा डोळ्यासमोर ठेवून घनश्याम शेलार यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर शिवसेना-भाजपमध्ये अंतर आल्याने उद्धव ठाकरे यांनी स्वतंत्र लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी करत असताना अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून घनश्याम शेलार यांना लोकसभा लढवण्याची गळ घातली. शेलार यांनी ही लोकसभेची तयारी चालू केली. असताना व त्या तयारीचा एक भाग म्हणून उद्धव ठाकरे यांची नगरमध्ये मोठी जाहीर सभा शेलार यांनी आयोजित केली होती. परंतु पुन्हा भाजप-शिवसेनेची युती झाल्याने शेलार यांचा शिवसेनेतही भ्रमनिरास झाला. शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना या सर्व पक्षांचा अनुभव घेता शेलार यांना राष्ट्रवादी एवढे बळ कोणत्याच पक्षाकडून मिळाले नाही. अगर सन्मानाची वागणूक मिळाली नसल्याची भावना शेलार समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे शेलार यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला. आक्रमक व अभ्यासपूर्ण भाषण शैली उत्तम संघटनकौशल्य या गुणांमुळे घनश्याम शेलार यांचे व्यक्तिमत्व उठून दिसते.राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा.शरद पवार यांनी विधानपरिषदेचा शब्द शेलार यांना दिला असल्याचे शेलार समर्थक संजय आनंदकर यांनी सांगितले. घनश्याम शेलार यांच्या बरोबर राजाराम जठार, संजय संजय, आनंदकर सुनिता, हिरडे अजीम, जकाते प्रकाश, निंभोरेसह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget