Breaking News

राहुल गांधी हे शेखचिल्ली मनेका गांधी यांची पुतण्यावर टीका

Image result for मनेका गांधी

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे रण आता चांगलेच पेटले आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर नाती-गाोती विसरून सत्तेसाठी जोरदार निशाणेबाजी करीत आहेत. गांधी घराण्यातीलच असणार्‍या भाजप नेत्या मनेका गांधी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची शेखचिल्ली म्हणून खिल्ली उडवली.

राहुल यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर देशात किमान उत्त्पन्न हमी योजना लागू करण्याची घोषणा करत गरिबांच्या खात्यावर वर्षाला 72 हजार रुपये जमा करण्याचे आश्‍वासन दिले. यावर बोलताना मनेका यांनी राहुल यांच्यावर निशाणा साधला. मी किमान उत्पन्न हमी योजनेवर बोलणार नाही. कारण मी शेखचिल्लींवर बोलत नाही, असे गांधी म्हणाल्या. अर्थात मनेका यांच्या मते राहुल यांनी जाहीर केलेली योजना ही एक दिवास्वप्न आहे. त्यामुळे त्यावर बोलण्यात अर्थ नाही, असे गांधी म्हणाल्या. प्रत्येक निवडणुकीची वेगळी आव्हाने असतात; परंतु गेल्या 5 वर्षांत संपूर्ण देशात भाजप सरकारने खूप कामे केली आहेत. आम्ही संघटितरित्या या निवडणुकीला सामोरे जात आहोत. मला खात्री आहे, की पुन्हा भाजपचीच सत्ता येणार आहे, असा आशावादही मनेका यांनी या वेळी व्यक्त केला.

दरम्यान, या वेळी भाजपने मनेका गांधी आणि त्यांचे पुत्र वरुण गांधी यांच्या तिकीटांची अदला-बदल केली आहे. मनेका यांना सुलतानपूर तर वरुण यांना पिलभीतमधून उमेदवारी देण्यात आली आहे; मात्र भाजपच्या उत्तर प्रदेशातील स्टार प्रचारकांच्या 40 जणांच्या यादीत दोघांनाही स्थान देण्यात आलेले नाही.