पार्थ पवार, उदयनराजेंवर उमेदवारीच्या अक्षता!

Image result for पार्थ पवार,

सातारा/मुंबई :
सातारा लोकसभेच्या जागेचा सस्पेन्स अखेर संपला असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. मनोमीलन तुटल्यानंतर एकमेकांना पाण्यात पाहणार्‍या दोन्ही राजांमध्ये दिलजमाई करण्यात पवार यशस्वी झाले आहेत. दरम्यान, मावळ लोकसभा मतदारसंघात पार्थ पवार यांच्या उमेदवारीला विरोध करूनही नंतर त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्याची वेळ पवार यांच्यावर आली.
शदर पवार यांनी मुंबईत सातारा आणि मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावावर चर्चा करण्यासाठी बैठक बोलविली होती. त्यातही सातारा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी अतिशय प्रतिष्ठेची बनली होती. राष्ट्रवादीच्या बहुतांश नेत्यांचा उदयनराजे यांना उमेदवारी द्यायला विरोध होता. नगरपालिका निवडणुकीनंतर उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यात कमालीचे वितुष्ठ निर्माण झाले होते. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचाही उदयनराजे यांनी अवमान केला होता. पवार यांनी मध्यस्थी करूनही दोन्ही राजांमध्ये समन्वय होत नव्हता. त्यातच भाजपचे संभाव्य उमेदवार नरेंद्र पाटील यांची शिवेंद्रराजे यांनी भेट घेतल्याने राजकीय भुवया उंचावल्या होत्या. शिवेंद्रराजे समर्थकांनी तर उदयनराजे यांना उमेदवारी मिळत असेल, तर भाजपत चला, असा सल्ला दिला होता.
या पार्श्‍वभूमीवर पवार याच्या मध्यस्थीनंतर दोन्ही राजेंचे मनोमीलन झाले आणि सातारा लोकसभेच्या जागेचा अखेर सस्पेन्स संपला. या वेळी एकदिलाने काम करण्याच्या सूचना दोघांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे लोकसभेला राष्ट्रवादीचे सर्व आमदार खा. उदयनराजे यांचे काम करणार आहेत. या बैठकीला उदयनराजे, शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर उदयनराजे यांनी, ‘येणार्‍या काळात सर्वांना सोबत घेऊन जायला तयार आहे,’ असे सांगितले.
मावळमधून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची उमेदवारी जवळपास निश्‍चित झाली असल्याची माहिती आहे. शरद पवार यांनी पार्थ निवडणुकीच्या रिंगणात असणार नाहीत, असे सांगितल्यानंतरही पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांनी पार्थ यांनाच उमेदवारी मिळेल, असे खात्रीने सांगितले होते. मुंबईत झालेल्या बैठकीत
पक्षाकडून पार्थ पवारांची उमेदवारी निश्‍चित करण्यात आली आहे, अशी माहिती आहे.
या मतदारसंघातून स्मिता पाटील यांचे नाव चर्चेत होते; परंतु पार्थ वगळता राष्ट्रवादीकडे कोणताही तुल्यबळ उमेदवार नाही. या मतदारसंघात असलेल्या पिंपरी-चिंचवडसह मोठ्या भागात अजित पवार यांना मानणारे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे आधीच उमेदवाराची असलेली कमतरता आणि त्यातच अजित पवार यांचे पुत्र म्हणून पार्थ पवार यांच्यामागे उभे राहणारी कार्यकर्त्यांची ताकद, या सगळ्या परिस्थितीमुळे मावळमधून पार्थ पवारांची उमेदवारी निश्‍चित झाल्याचे सांगितले जाते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget