Breaking News

अडथळे आणूनही येणके पुलाच्या कामास मंजूरी : आ. चव्हाणकराड /प्रतिनिधी : येणके- पोतले दरम्यानच्या वांग नदीवरील पुलाच्या कामाची निविदा प्रसिध्द झाली आहे. या विभागात या पुलाचे काम होणे ही खूप महत्वाची बाब होती. पुलाचे काम मंजूर करताना मला खूप त्रास झाला. हे काम बर्‍याच लोकांनी अडविण्याचा देखील प्रयत्न केला असला, तरीही मी ते मंजूर केले. असे सांगून या विभागाच्या विकासासाठी मी व माझे सहकारी कटिबध्द आहोत, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
पोतले व शिंदेवाडी (विंग) येथील विविध विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. आनंदराव पाटील, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप, अजितराव पाटील-चिखलीकर, युवा नेते इंद्रजीत चव्हाण, ऍड. नरेंद्र नांगरे-पाटील, शिवराज मोरे, जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले, सदस्या मंगलताई गलांडे, पंचायत समिती सदस्य उत्तमराव पाटील, सदस्या नंदाताई यादव, सरपंच वैशाली माळी, येरवळेचे सरपंच सुभाषराव पाटील, शिंदेवाडीचे माजी सरपंच निवासराव शिंदे, सयाजी यादव, शिवाजीराव मोहिते, नितीन थोरात, येणकेच्या उपसरपंच नंदाताई गरुड, आदील मोमीन, डॉ. सचिन कोळेकर, झाकीर पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती.