Breaking News

कितीही कॉलर उडवा, लोक धडा शिकवतील

 
सातारा / प्रतिनिधी : सातारा लोकसभा मतदारसंघात कुणी कितीही कॉलर उडवू देत, लोकच त्यांना धडा शिकवतील. शेवटी तृतीयपंथीयांच्याच टाळ्या वाजतील, असा इशारा तृतीयपंथीय समाजातील अपक्ष उमदेवार प्रशांत वारकर यांनी सांगितले.

सध्या मतदारसंघात प्रशांत वारकर यांच्याकडून एकखांबी प्रचार सुरु आहे. आम्ही तृतीयपंथी असलो म्हणून काय झालं. आम्हांलाही सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. कायद्याने तो आम्हांला बहाल केला आहे. राजकीय क्षेत्रात आम्हांलाही प्रतिनिधीत्व करायचं आहे. त्यामुळेच सातारा लोकसभा मतदारसंघातून रणांगणात उतरलो असून उदयनराजेंच्या विरोधात लढत देणार असल्याचे वारकर याने सांगितले.
सातारा जिल्ह्यात आतापर्यंत राजकारण्यांनी जनतेला लुटलं आहे. विकासकामांच्या नावाने बोंब पहायला मिळत आहे. ज्यांनी लोकांना लुटलं, फसवलं त्यांना आता ते धडा शिकवतील. कुणी कितीही कॉलर डडवली तरी शेवटी टाळ्या तृतीयपंथीयाच्याच वाजणार हे संबंधितांनी लक्षात ठेवावे, असे प्रशांत वारकर यांनी सांगितले.