Breaking News

प्रचाराला जाताय, जरा जपून, क्षणात होतेय हाथ की सफाई


सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यात काही वर्षापासून गर्दीच्या ठिकाणी पाकिट, मोबाईल, पर्स चोरीला गेल्याची नोंद विविध पोलीस ठाण्यात झाली आहे. विशेषत: वार्षिक यात्रा,बाजारात गेलेल्या लोकांना त्याचा फटका बसला आहे. आता चोरांचाही नवा ट्रेन सुरू झाला असून राजकीय पक्षाच्या सभेला उपस्थित राहणार्या काहींचे मौल्यवान वस्तू गायब होत आहेत. त्यामुळे सभा ऐकायला जाताय जरा जपून कारण क्षणात हाथ की सफाई होण्याची प्रकरणे वाढू लागली आहेत. 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर प्रचारानिमित सध्या राजकीय पक्ष व मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठका व मेळावे होवू लागलेले आहेत. मात्तबर उमेदवार रिंगणात असल्यामुळे चुरस वाढू लागलेेले आहेत. कायदा व सुव्यवस्था आणि विकास याची कितीही आश्र्वासने दिली तरी, प्रत्यक्षात मात्र जे घडते, ते लोकांपर्यंत कमी प्रमाणात पोहोचते. त्यामुळे असे काही घडले नाही, असे सांगण्यासाठी राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये चढाओढ होते. सध्या वाढत्या बेरोजगारीमुळे अनेक युवक व तरूण अशा मेळाव्याला गर्दी करून आपल्या लाडक्या नेत्याच्या आगमन व भाषणाच्यावेळी घोषणाबाजी,फटाक्यांची अतिषबाजी व टाळ्या आणि शिट्या वाजवत असल्यामुळे काहींना संमोहन केल्यासारखे वाटते आणि अशा वेळी चार-दोन टोळक्यांचा ग्रुप आपले सावज हेरून हाथ की सफाई करीत आहेत.

 ही बाब उघड झाली असली तरी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास कोणी धजवत नाही. कारण यामध्ये काही शासकीय सेवक, इतर पक्षातील स्वत:ला निष्ठावंत समजणारे कार्यकर्ते व त्यांचे संमर्थक यांनासुद्धा फटका बसत आहे. त्यामुळे काहजण तक्रार देण्यास पुढे येत नाहीत, हे सुद्धा स्पष्ट झालेले आहे. वरिष्ठ नेते व उमेदवारांना सुरक्षाकवच असते. परंतु प्रचार्‍याच्या सोयीने बाजारहाट त्यानिमित्त होईल, असे स्वप्न पाहणार्यांची पिशवी घरी रिकामी जावू लागली आहे. त्यात विकासाचे स्वप्न कधी पूर्ण होणार? हे जरी ते विसरत असले तरी आपले पाकिट, मोबाईल, पर्स व मौल्यवान वस्तू वर लक्ष दिले पाहिजे याची शिकवण यानिमित्त अनेकांना मिळू लागली आहे.