Breaking News

चापडगाव येथे महाशिवरात्र उत्सव


चापडगाव/प्रतिनिधी : शेवगाव तालुक्यातील चापडगाव येथे महाशिवरात्री निमित्ताने महाशिवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने दशनाम आखाडा येथे हिम्मतराव गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 

या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. काकडा भजन हरिपाठ कीर्तन प्रवचन कबीरपंथी भजन देखील आयोजन करण्यात आले होते. हभप काशिनाथ महाराज, वाघमारे संजय बडे यांचे प्रवचन झाले. महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.