Breaking News

सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या वाढदिवसानिमीत्त विवीध कार्यक्रम


जामखेड ता/प्रतिनीधी" :जैन कॉन्फरन्स दिल्ली आणि कोठारी प्रतिष्ठान जामखेड यांच्या संयुक्त विद्यमाने जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांचा 56 वा वाढदिवस विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. 

यावेळी डॉ. योगेश पवार म्हणाले की, आज संजय कोठारी यांनी आगळा वेगळा वाढदिवस केला. आनाथांना मिष्ठांन्न भोजन, वृध्दांना मिष्ठांन्न भोजन, मुकबधीररांना मिष्ठांन्न भोजन हे पाहुन आनंद वाटला. कोठारी यांचे सामाजिक कार्य सर्वश्रुत असून सालाबाद प्रमाणे विवीध कार्यक्रम आयोजित केले आहेत. दि.3 रोजी निवासी मुकबधीर विद्यार्थ्यांना भोजन देऊन मुलांसोबत केक कापून वाढदिवस साजरा केला. सदर कार्यक्राचे अध्यक्ष डॉ. योगेश पवार (सहाय्यक प्राध्यापक) हे होते. तर अंतरवली ता.भुम जि.उस्मानाबाद येथील वृद्धाश्रमातील वृद्धांना भोजन व तेथे वृद्धाश्रमात वृक्षरोपण करण्यात आले. तसेच नागेश विद्यालयातील वसतिगृहातील मुलांना मिठाई वाटप करण्यात आली. तसेच निवारा बालगृह मधील मुलांना मिठाई बाटप करण्यात आली.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुने म्हणून माजी जि.प.सदस्य कांतीलाल खिवंसरा, कांतीलाल कोठारी, कॅप्टन लक्षमन भोरे, रोहिदास केकाण, उद्योगपती प्रविणजी छाजेड, गणेश देवकाते आय.सी.आय.सी.आय. बँकेचे फायन्सीयल सर्विस मँनेजर, जैन सोशलचे तालुकाध्यक्ष गणेश भळगट, भारतीय जैन संघटनेचे तालुकाध्यक्ष अमोल ताथेड, मर्चंट बँकेचे अनिल फिरोदिया, ह.भ.प. अमृत महाराज डुचे, लिलाचंद मंडलेचा, अरुण लटके तसेच ओम हाँस्पीटलचे संचालक सचिन ठोबंरे, सचिन गाडे, नितीन सोळंकी, प्रफुल सोळंकी, सुनिल गोलांडे, संतोष गर्जे, लोखंडे महाराज हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. संजय कोठारी हे गेल्या 30 वर्षा पासून विविध प्रकारे सामाजिक कार्य करतात.